आनंदाची बातमी! राज्यातील या मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय!

राज्यातील मानधन तत्वावर असलेल्या अंशकालीन निदेशकांना तातडीने नियुक्ती देण्याबरोबरच आता राज्यातील शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, काय आहे प्रकरण सविस्तर वाचा..

अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Part Time Director

चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक अर्थात अतिथी निदेशक यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, तसे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यासह राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले आहेत. अतिथी निदेशकांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीला आता यश आले आहे.

दिनांक 19 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात मार्ग काढून न्याय देण्यात येईल - ग्रामविकास मंत्री

राज्यातील गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन, NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत समायोजन..

मा. उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षण यात गोडी वाढावी म्हणून समग्र शिक्षामार्फत या वर्गांना अतिथी निदेशक अर्थात अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र या शिक्षकांच्या नियुक्ती व मानधन प्रश्नी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे या निदर्शकांच्या वतीने पिटिशन ८७८६/२०१८ दाखल करण्यात आले होते. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात

सन २०१८ पासून अतिथी निदेशकांचे नियुक्त प्रकरण न्यायालयीन कारणाने राखडलेल्या होत्या. या याचिकेची ८ मे २०२४ रोजी मा. उच्च न्यायालय मुंबईमध्ये सुनावणी होऊन या अतिथी निदेशक यांना तातडीने नियुक्ती देण्याबाबतचे निर्देश मा. न्यायालयाने दिले होते. 

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

या न्यायालयाच्या निर्णयानुसार अतिथी निदेशकांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दीपक जी. के. मंत्री शालेय शिक्षण क्रीडा विभाग शालेय शिक्षण सचिव व राज्य प्रकल्प संचालक समर शिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले होती. यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आदेश देऊन संबंधित याचिकाकर्ते अंशकालीन निदेशकांना तत्काळ पूर्वीच्या शाळेत उपस्थित करून घेण्याचे आदेश दिल्याचे राजगुरू यांनी सांगितले.

27 वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत - विधनपरिषदेत प्रश्न

अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण होणार

अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 5 जुलै 2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला असून, त्यानुसार आता अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीची प्रक्रिया, पदस्थापना व अंशकालीन निदेशकांच्या पदाचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारकडून खुलासा

राज्यातील ‘या’ कर्मऱ्यांच्या संदर्भात मंत्रालय येथे महत्वाची बैठक संपन्न

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार

सात हजार रुपये मानधन अदा होणार

ज्या शाळेची ६ ते ८ ची पटसंख्या १०० पेक्षा अधिक असेल या ठिकाणी तत्कालीन कार्यरत अंशकालीन निदेशकांना हजर करून घेण्यात यावे. जर त्या शाळेची पटसंख्या १०० पेक्षा कमी असल्यास बाजूच्या ज्या शाळेमध्ये ६ ते ८ ची १०० पेक्षा अधिक पट असेल अशा ठिकाणी या निदेशकांना उपस्थित करून घ्यावे,

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंशकालीन निदेशकांना एप्रिल २४ पासून दरमहा ७ हजार रुपये मानधन अदा करण्यात येणार आहे, असे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत. लवकरच अंशकालीन निदेशकांकरिता कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी स्वतंत्र धोरण शासनाकडून जाहीर करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षण यांच्या नियुक्तीचा आदेश शासनाच्या वतीने निर्गमित केला आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र १०० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अतिथी निदेशकांचासुद्धा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. - संतोष राजगुरु, राज्याध्यक्ष, - प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना

आनंदाची बातमी! शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 'या' प्रलंबित मागणीवर, शिक्षण मंत्र्यांकडून महत्वाचा खुलासा!

राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी

सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करणेबाबत - तारांकित प्रश्न

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी गुड न्यूज!


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now