आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न

Asha Worker Latest News: कंत्राटी तत्वावर असलेल्या सहाय्यक आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबतचा आतारांकित प्रश्न राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता, यानुषंगाने सरकारकडून मुख्यमंत्री यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत

Asha Worker Latest News

गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन, NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत सामावून...

आतारांकित प्रश्न खालीलप्रमाणे

  1. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी लसटोचकांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे मात्र, लसीकरण कार्यक्रमांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ४३४ सहाय्यक आरोग्य सेविकांची कायमस्वरुपी पदे मागील ३ वर्षांपासून रिक्त असल्याचे माहे जानेवारी, २०२३ वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
  2. असल्यास, प्रशासनाकडून प्रत्येक दिवसाला २ याप्रमाणे एकुण ४१४ शिबिरांचे आयोजन करण्यात येते, महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या निकषानूसार १० हजार लोकसंख्येसाठी १ सहाय्यक परिचारिका तर १० हजार लोकसंख्येसाठी ३ आशासेविका आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
  3. असल्यास, आरोग्य कार्यक्रमांमध्ये लसीकरण, कुटुंब नियोजन, गर्भवती महिला संदर्भातील आरोग्य मोहिमेचा पाठपुरावा करण्याचें काम ६० टक्के इतकी असते त्यामुळे कंत्राटी नाहीतर पूर्णवेळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अधिक गरज असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
  4. असल्यास, मुंबई शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना सुसज्ज आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कंत्राटी पध्दतीवर नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक आरोग्य सेविकांची कायमस्वरुपी पदे भरण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न लेखी उत्तर पाहा

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय!

वरील आतारांकित प्रश्नावर सन्माननीय मुख्यमंत्री यांनी खालीलप्रमाणे खुलासा केला आहे. 

  1. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये व कोविड लसीकरण केंद्रांमध्ये कोविड लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०२१-२२ करिता कंत्राटी पध्दतीने परिचारीकांची (लसटोचक) नियुक्ती करण्यात आली होती.
  2. तसेच, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर बाह्य लसीकरण सत्रासाठी प्रतिसत्र मानधनावर लसटोचक अशी नेमणूक करण्यासाठी विविध स्थानिक वृत्तपत्रांत दिनांक २१.१२.२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि सदर जाहिरातीस प्रतिसाद न लाभल्यामुळे कंत्राटी लसटोचकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
  3. बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत सहाय्यक आरोग्य सेविका असे पद अस्तित्वात नाही. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये साह्यकारी परिचारीकांची (प्रसविका) या संवर्गाची ४२१ पदे रिक्त आहेत. (२), (३) व (४) सदर साह्यकारी परिचारीकांची (प्रसविका) ४२१ रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक ९ जानेवारी, २०२३ मध्ये सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जाची छाननी व पडताळणी पूर्ण झालेली आहे. तदनुसार उमेदवारांना पात्र / अपात्र करुन प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्यात आला असून, मंजुरी प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित पध्दतीने नियुक्ती देण्यात येणार आहे.
  4. कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कोणतेही धोरण नाही. तथापि, कंत्राटी तत्वावरील लसटोचक, साह्यकारी परिचारीका (प्रसविका) या पदाची अर्हता धारण करीत असल्यास ते अर्ज करण्यास पात्र राहतील व गुणवत्तेनुसार त्यांची निवड करण्यात येईल.
  5. प्रश्न उद्भवत नाही.

माननीय विधिमंडळ सदस्य : अॅड. आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड. पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री. अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री. अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री. किसन कथोरे (मुरबाड), श्री. पराग शाह (घाटकोपर पूर्व), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री. मिहीर कोटेचा (मुलुंड), श्री. समाधान अवताडे (पंढरपूर), श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा), श्री. रईस शेख (भिवंडी पूर्व), श्री. योगेश सागर (चारकोप), प्रा. वर्षा गायकवाड (धारावी), श्री. झीशान सिद्दिकी (वांद्रे पूर्व), श्री. राम कदम (घाटकोपर पश्चिम): यांनी सदर आतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय!

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना मोठा दिलासा!

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now