Employees Regularization : राज्यातील रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने दिनांक 24 जून रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय!
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहामधील रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यातचा शासन निर्णय दिनांक 24 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय लिंक शेवटी दिलेली आहे.)
सदर कर्मचारी रोजंदारी/तासिका तत्वावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत.
अशा कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. मा.न्यायालयाने सदर रिट याचिका प्रकरणी दि.३१ ऑक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयात १० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या याचिकाकर्त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयानेही मा. उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत.
मोठी अपडेट! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजनासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर
ही बाब विचारात घेवून रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत दाखल रिट याचिकांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी मा. उच्च न्यायालयाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दि.१२.०४.२०२२ व दि.०६.०२.२०२३ नुसार शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे.
त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पदावर रोजंदारी तत्वावर कार्यरत असलेल्या विविध मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याप्रकरणी देखील मा. न्यायालयाने दि.३१.१०.२०१८ रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय दिलेला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन..
त्यानुसार मा. उच्च न्यायालयाने दि.३१.१०.२०१८ रोजीच्या निर्णयात नमूद बाबींची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आशा स्वयंमसेविका लेटेस्ट अपडेट पाहा
या कर्मचाऱ्यांची आश्रमशाळांमधील शिक्षणाचे व विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याचे काम नियमितपणे सुरु राहण्यासाठी आश्रमशाळांमधील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विषयनिहाय आवश्यकतेप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तासिका तत्वावर,मानधनावर नियुक्ती संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास/प्रकल्प अधिकारी/मुख्याध्यापक स्तरावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेली होती.
शासन सेवेत नियमित करण्याचा शासन निर्णय पाहा
आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या संदर्भात