महत्वाची अपडेट! आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप

Aasha Worker News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना  दि २३ जून रोजी मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले आहे.

आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप

aasha worker news

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील १३ तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात दि २३ जून रोजी मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे.

आशा गटपर्वतक, अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी लेटेस्ट अपडेट

अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय!

देवगिरी शासकीय निवासस्थानी यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जयस्‍वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

aasha-worker-news

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका महिला कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती सुरू

ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा

ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. आधुनिक युगात आता शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाल, लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करणे क्रमप्राप्त झाले आहे. या कामांमध्ये आशा सेविकांना तत्परतेने काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीने त्यांना आधुनिक अँड्राईड मोबाईल देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजना, यू विन पोर्टल, आयुष्यमान भारत ई-कार्ड, आभा कार्ड तसेच अन्य ऑनलाईन कामे आता आशांना या मोबाईलच्या मदतीने करणे सुलभ होईल.

आशा स्वयंम सेविका ताज्या बातम्या येथे पाहा

यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ९० लक्ष ९८ हजार ९० रूपये निधी आरोग्य व्यस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, कळमेश्वर, मोदा, कामठी, हिंगणा, नागपूर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, नरखेड व काटोल या १३ तालुक्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कामांना गती मिळेल.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात निर्णय

कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन होणार

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now