आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्याचा वाढीव मोबदला वितरित!

NHM Employees Salary GR : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना देण्यात येणारा वाढीव मोबदला एप्रिल, २०२४ ते जुन, २०२४ या कालावधीतील रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

nhm employees salary gr

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) : कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच, दिनांक १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात रु.५०००/- व तर गटप्रर्वतक यांच्या मानधनात रु.१०००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची भरीव वाढ, ‘या’ महिन्यापासून मिळणार

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ३२८६७.९९ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून, एप्रिल २०२४ ते जून, २०२४ या ३ महिन्याचे रु.२४८१६.९२ लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, याबाबतचा शासन  ५ जून २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. (शासन निर्णय पाहा)

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त बैठक संपन्न - बैठकितील महत्वाचे मुद्दे

आशा सेविका आणि आरोग्य सेविकांच्या मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

आनंदाची बातमी! NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now