आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त बैठक संपन्न - बैठकितील महत्वाचे मुद्दे

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला बचत गट प्रवर्तकांची एक संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली असून, या बैठकीतील महत्वाचे मुद्दे.. 

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त बैठक संपन्न - बैठकितील महत्वाचे मुद्दे

Asha Workers

मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला बचत गट प्रवर्तकांची एक संयुक्त बैठक शुक्रवारी (दि. 14) रोजी वडगाव येथे पार पडली. या बैठकीमध्ये आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या कामातील अडचणी आणि सूचना समजून घेतल्या. या बैठकीला गटविकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल कोतागडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक २७ जून पासून मुंबईत सुरु होत असून, त्याअनुषंगाने आमदार शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना, तुमच्या काही समस्या, काही प्रश्न विधानसभेत मांडायचे असल्यास ते माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले. त्याचबरोबर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकाअंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील त्या सरकारसमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा करत, एकजूटीने कार्य करण्याचे आवाहन

Asha Workers

कोरोना काळात आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेल्या चांगल्या कार्याचे कौतुक केले, ग्रामीण भागातील आरोग्य, महिला व बाल विकासाच्या दृष्टीने आपण सर्व भगिनी सतत कार्य करीत आहेत, शासकीय योजनांची गावपातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी या भगिनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आहात.

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करणार - आ. सतीश चव्हाण

शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गट ही संकल्पना आणली असून, महिलांना उत्कर्षाच्या अनेक संधी आहेत. ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकते. बचत गटातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता बँकांनीही पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब? 

आपण सर्वानी एकजूटीने कार्य केल्यास ग्रामीण भागात नक्कीच परिवर्तन घडू शकते. विकासाच्या प्रवाहात महिलांची देखील सक्रियता राहू शकते. यासाठी माझ्याकडून शक्य होईल ते सहकार्य नेहमीच करीत आलो आहे. भविष्यकाळात देखील करत राहील, हा विश्वास माझ्या सर्व भगिनींना देतो, अशी प्रतिक्रिया आमदार शेळकेंनी दिली.

अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून सर्वेक्षण

हे ही वाचा: आशा सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

#AshaWorkers #AnganwadiSevika

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now