कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक!

NHM Contractual Employees: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशन करण्यासंदर्भात एक महत्वाची बैठक मंत्रालय मुंबई येथे दिनांक 19 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कार्यवाही सुरू

NHM Contractual Employees

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजन करण्यासाठी राज्य शासनाने मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक 13 मार्च 2024 रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सदरचा शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024  रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करुन त्यामध्ये रिक्त होणा-या समकक्ष पदांवर, सरळ सेवेने 70 टक्के व समावेशनाने 30 टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत, सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित केला आहे.

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक!

त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशन करण्यासंदर्भात दिनांक 5  एप्रिल 2024 च्या पत्रान्वये मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात आलेली आहे.

आयुक्त, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदावर आता नवीन IAS अधिकारी

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्याचा वाढीव मोबदला वितरित!

सदर समितीची रचना पुढील प्रमाणे

  1. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई - अध्यक्ष
  2. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
  3. प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
  4. आयुक्त, आरोग्य सेवा, आयुक्तालय, मुंबई - सदस्य
  5. सहसचिव/उपसचिव (आरोग्य-७/, सेवा-१/सेवा-५), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
  6. राष्ट्रीय आरोग्य अभियान, कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष - सदस्य
  7. अवर सचिव, आरोग्य-७, मंत्रालय, मुबई - सदस्य सचिव

सदर समितीस NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन करण्यासाठी शिफारस करण्याकरिता सदर समितीसाठी पुढील कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे. सविस्तर येथे पाहा. 

त्यानुषंगाणे आता मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली गठित  करण्यात आलेल्या समितीची बैठक बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता मा. अपर मुख्य सचिव यांचे दालन, 10 वा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

सविस्तर माहितीसाठी परिपत्रक येथे पाहा 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करणार - आ. सतीश चव्हाण

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त बैठक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now