राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशन करण्यासंदर्भात - समितीची कार्यकक्षा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशन करण्यासंदर्भात दिनांक 5  एप्रिल 2024 च्या पत्रान्वये मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशन करण्यासंदर्भात - समितीची कार्यकक्षा

NHM Contractual Employees

सदर समितीची रचना पुढील प्रमाणे

  1. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई - अध्यक्ष
  2. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
  3. प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
  4. आयुक्त, आरोग्य सेवा, आयुक्तालय, मुंबई - सदस्य
  5. सहसचिव/उपसचिव (आरोग्य-७/, सेवा-१/सेवा-५), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई - सदस्य
  6. राष्ट्रीय आरोग्य अभियान, कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष - सदस्य
  7. अवर सचिव, आरोग्य-७, मंत्रालय, मुबई - सदस्य सचिव

समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे

  1. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब. गट-क व गट-ड संवर्गातील मंजूर पदांच्या आकृतीबंधामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या समकक्ष पदांचा शोध घेणे, 
  2. समकक्ष पदे नसल्यास समकक्ष वेतनश्रेणी/ मानधन असलेली पदे शोधणे,
  3. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील कंत्राटी कर्मचा-यांशी समकक्ष पदे निश्चित करुन सार्वजनिक आरोग्य विभागास शिफारस करणे.
  4. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचा-यांची भरती जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशी होत असल्याने सदर पदांची जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशा स्वतंत्र संवर्गनिहाय ज्येष्ठतासुच्या तयार होत असतात. तथापि, कंत्राटी कर्मचा-यांची संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार समावेश करावयाचे असल्याने सदर कर्मचा-यांच्या ज्येष्ठतासुच्या एकत्रित करुन राज्यस्तरावर प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र ज्येष्ठतासुची तयार करुन सार्वजनिक आरोग्य विभागास शिफारस करणे,
  5. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमित पदांच्या समकक्ष कंत्राटी कर्मचा-यांची पदे निश्चित झाल्यानंतर समकक्ष मंजूर पदांच्या वेतनश्रेणीतील पुढच्या टप्प्यावर कंत्राटी कर्मचा-यांच्या वेतनाची निश्चिती करुन सार्वजनिक आरोग्य विभागास शिफारस करणे,
  6. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी दिनांक २५/१०/२०२३ ते २९/११/२०२३ या कालावधीपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होते. कामबंद आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या कर्मचा-यांचे वेतन कपात, सेवाखंड व त्यांच्या विरुध्द दाखल झालेल्या गुन्हयासंदर्भातील यथायोग्य निर्णय करण्याबाबत समिती शासनास शिफारस करेल.
  7. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांचे समावेश करताना उद्भणा-या तांत्रिक अडचणी संदर्भात समिती यथायोग्य मार्गदर्शन / शिफारस करेल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now