Retirement age of Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता निवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, महागाई भत्ता वाढ व इतर अन्य प्रलंबित असलेल्या या मागणी संदर्भात नुकतीच अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक संपन्न झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार?
मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली, तसेच 10 जून रोजी मुख्य सचिवांनीही बैठक घेतली. या दोन्ही बैठकीत अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा, या उद्देशाने सरकारने सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याबाबत चर्चा करण्यात आली, यावेळी दोघांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
केंद्राप्रमाणे मिळणार महागाई भत्ता
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्यावरून 50 टक्के केला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्ता वाढवण्यात यावा, याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केला असून, तो शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच महासंघाच्या कल्याण केंद्र उभारणीचे काम गतीने सुरू आहे, ती गती कमी होऊ नये, यासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसेच सरकारी नोकऱ्यांची 3 लाख रिक्त पदे भरावीत, अशी मागणीही महासंघाकडून करण्यात आल्याची माहिती, महासंघाचे ग. दि. कुलथे यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होणार
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक!
अतिरिक्त सचिवपदे निर्माण होणार
मंत्रालयीन सहसचिव पदासाठीची कमतरता घालविण्यासाठी अन्य राज्यांप्रमाणे अतिरिक्त सचिव पदे तयार करा, अशा सूचना यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.
आयुर्मान वाढले, आता सेवा निवृत्ती वय वाढवण्यास हरकत नाही - संशोधन
सेवानिवृत्तीचे वय वाढवावे की नाही, यावरून राज्यातच नाहीतर संपूर्ण जगभरामध्ये याबाबत चर्चा सुरू आहेत. गतवर्षी बोस्टन कॉलेज मधील (Boston College, Gal Wetstein) गॅल वेटस्टीन यांनी केलेल्या आयुर्मान विषयावरील संशोधनानुसार व्यक्तीचे सरासरी आयुर्मान हे 70 वर्ष झाले आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत हे आयुर्मान वाढले आहे.
सेवानिवृत्ती हा विषय प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, सेवानिवृत्तीचा परिणाम हा व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होतो असे संशोधन सांगते. तज्ञ सांगतात की, ज्यावेळी सेवानिवृत्ती होते तेव्हा काही लोक काम करणे बंद करतात तेव्हा, त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते.
संशोधनानुसार सेवानिवृत्तीचे वय जेवढे जास्त तेवढे ते चांगले आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, नोकरीशी संबंधित शारीरिक हालचाल थांबणे व सामाजिक संपर्क कमी होणे हे निवृत्तीनंतर होणाऱ्या घसरणीची मोठी कारणे आहे. संशोधन सविस्तर येथे वाचा
कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!
राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सुधारणांबाबत महत्वाची बैठक संपन्न
'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?