'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब? 'या' पर्यंत पालकांना करावी लागणार प्रतीक्षा

RTE Lottery Result 2024 : शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागेवरील प्रवेशासाठीच्या लॉटरीच्या निकालासाठी पालकांना आणखी दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया...

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

RTE Lottery Result 2024

शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील RTE प्रवेशासंदर्भात यंदा मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, मे महिन्यात आर टी ई 25% प्रवेश प्रक्रिया नव्याने पुन्हा राबविण्यात आली, त्यानंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज केले, त्यानंतर 7 जून 2024 रोजी RTE ची ऑनलाईन सोडत काढण्यात आली, मात्र लॉटरी ची निवड यादी राखून ठेवण्यात आली आहे.

शिक्षण हक्क 'आरटीई' योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी 9 हजार 217 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 399 जागांसाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले असून, निवड झालेल्या बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यांची RTE Lottery Result 2024 25 PDF यादी RTE पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.

 RTE पोर्टलवर जाहीर केलेल्या सूचनेनुसार मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.

याचे कारण असे आहे की, RTE प्रवेशाचे प्रकरण सद्या उच्च न्यायालयात असून, याबाबतची सुनावणी दिनांक 13 जून रोजी होती, मात्र आता पुढील सुनावणी 18 जून रोजी असल्याने तोपर्यंत लॉटरी ची यादी जाहीर करता येणार नसल्याने पालकांना अजून 18 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

RTE Lottery Result 2024 25 PDF List - आरटीई' लॉटरी निवड यादी जाहीर होताच येथे पाहा

लेक लाडकी’ योजनेचा लाभ किती? अर्ज कोठे करावा? जाणून घ्या तपशील

मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम राबविला जाणार, काय आहे उपक्रम? जाणून घ्या.....

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now