मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून मुंबईत

Monsoon Session:  विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून मुंबईत

Monsoon session

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून सर्वेक्षण

हे ही वाचा: आशा सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now