राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदाचा आता नवीन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांनी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
आयुक्त, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदावर 'या' नवीन IAS अधिकारी यांनी स्वीकारला कार्यभार
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान या योजनेची अंबलबजावणी राज्यामध्ये करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदाचा कार्यभार मा.श्री.अमगोथू श्रीरंगा नायक, भा.प्र.से (IAS officer) यांनी (दि 18) जून 2024 रोजी स्विकारला आहे.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार, प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात शासन निर्णय
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजन करण्यासाठी राज्य शासनाने मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक 13 मार्च 2024 रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सदरचा शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला शासन निर्णय पाहा
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करुन त्यामध्ये रिक्त होणा-या समकक्ष पदांवर, सरळ सेवेने 70 टक्के व समावेशनाने 30 टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत, सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित केला आहे.
राज्यातील 'या' पात्र कर्मचाऱ्यांना 26 जून रोजी सुट्टी मिळणार
आता या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशन करण्यासंदर्भात दिनांक 5 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. लवकरच या समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित होणार आहे.
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक