राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे.
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा
विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी मर्यादीत स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही रजा मिळणार आहे.
मोठी बातमी! राज्यात पुन्हा निवडणुका जाहीर - पाहा सविस्तर वेळापत्रक
ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.