RTE LATEST NEWS: शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील RTE 25 टक्के प्रवेश रखडले असून, यासंदर्भात मा. न्यायलयात (दि 18) जून रोजी सुनावणी झाली, मात्र आजही यासंदर्भात अंतिम निर्णय न आल्यामुळे RTE लॉटरीची यादी आता लांबणीवर पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
राज्यातील काही शिक्षण संस्थांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे सुनावणी लांबली असून, यामुळे राज्यातील RTE 25% प्रवेश प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे.
हस्तक्षेप करणाऱ्या संस्थांना आता 10 दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडावे लागणार आहे, त्यानंतर, जनहित याचिकाकर्त्या आणि राज्य सरकार यांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार असून, 11 जुलै 2024 रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीत न्यायालय RTE प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे.
दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी, महाराष्ट्र सरकारने RTE प्रवेश प्रक्रियेत बदल केले. या निर्णयाच्या विरोधात RTE चे प्रकरण मा. न्यायलयात न्यायप्रविष्ठ आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील RTE प्रवेशासंदर्भात यंदा मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, मे महिन्यात आर टी ई 25% प्रवेश प्रक्रिया नव्याने पुन्हा राबविण्यात आली, त्यानंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज केले, त्यानंतर 7 जून 2024 रोजी RTE ची ऑनलाईन सोडत काढण्यात आली, मात्र लॉटरी ची निवड यादी (RTE Lottery Result 2024 25 PDF) राखून ठेवण्यात आली आहे.
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!
RTE पोर्टलवर जाहीर केलेल्या सूचनेनुसार मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी : https://student.maharashtra.gov.in/
मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा पडताळणी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक