Contractual Employees Regularisation: राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली, त्यामध्ये समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि 19 रोजी दिले आहेत.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजनासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश
दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येऊ न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि 19 जून रोजी दिले.
NHM अंतर्गत नवीन जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती सुरू
- दिनांक 26 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा.
- वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
- टाटा सामाजिक संस्थेने (TISS) प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. हा अहवाल लवकरच शासनास प्राप्त होणार आहे.
- दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! विविध मागण्यासंदर्भात बैठकीत महत्वाचे निर्णय
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
आयुक्त, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदावर आता नवीन IAS अधिकारी
दिव्यांग शिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाहतूक भत्ता वाढविण्याचा आणि २० फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यातील ६ जिल्हा समन्वयक, ५२ विशेष तज्ज्ञ/ समावेशित शिक्षक व १५८ विशेष शिक्षक अशा २१६ कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक