मोठी संधी! JEE-NEET साठी मोफत प्रशिक्षण! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर आणि नागपूरमध्ये जागा उपलब्ध!

महाराष्ट्र राज्यातील  पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

Coaching-for-JEE-NEET

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे मोफत अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-100 व NEET-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.

विद्यार्थी निवडीचे निकष

प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल.

आरक्षण

महिला 30%, दिव्यांग (PWD) 5%, अनाथ-1%, वंचित-5% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ. साठी), जागा आरक्षित असतील.

आवश्यक पात्रता

  1. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
  3. उमेदवार शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये इयत्ता 11 वी (विज्ञान) चे शिक्षण घेत असावा.
  4. रु. 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.
  5. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  6. उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.

MHT CET 2024 LIVE निकाल येथे पाहा

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती

  1. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 पर्यंत आहे.
  2. प्रशिक्षण कालावधी 24 महिन्यांचा राहील.
  3. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान 75 टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000 एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल.
  4. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.5000 एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.
  5. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, BARTI व शासनास राहतील.

प्रशिक्षण ठिकाण, प्रशिक्षण केंद्राचे नाव व प्रशिक्षण केंद्र पत्ता येथे पाहा. - संपूर्ण जाहिरात

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. 13 जून 2024 पासून https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.

अधिकृत वेबसाईट: https://barti.in/

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now