SARATHI Scholarship 2024: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARATHI), पुणे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली असून, परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेकरिता ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
विदेशातील शिक्षणासाठी 'सारथीची' शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या "मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा" जातीतील गुणवंत मुला-मुलींना "महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना" अंतर्गत सन 2024-25" करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (PHD) विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Download score Card(PCM/PCB Group)
सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे शाखानिहाय / अभ्यासक्रमनिहाय शिष्यवृत्तीची मंजूर संख्या खाली दिलेली आहे.
सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष
- उमेदवार व उमेदवाराचे आई वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यावत (सन 2024) मधील) QS (Quacquarelli Symonds) World Ranking 200 च्या आत असणे बंधनकारक आहे.
- उमेदवाराच्या पालकांचे कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्यांचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक (2023-24) मधील एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
सारथी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज
सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता मिळणारे लाभ व निवड पद्धत, सुधारित वेळापत्रक इत्यादी माहितीकरिता सारथी संस्थेचेसंकेतस्थळास https://sarthi-maharashtragov.in/ वेळोवेळी भेट द्यावी.
इच्छुक उमेदवारांनी https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज भरावा व ऑनलाइन (Online) भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रती पडताळणीसाठी, सारथी मुख्यालयास खालील वेळापत्रकानुसार सादर करावीत.
- संकेतस्थळावर ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज भरणे व आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे ऑनलाइन (Online) अर्जातसोबत अपलोड करणे - दि. 15 जून, 2024 ते 30 जुलै, 2024
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे त्यांच्या स्वसाक्षांकीत प्रतीसह पडताळणीसाठी सारथी संस्थेच्या बालचित्रवाणी, सी टी सव्हे क्रमांक १७३. बी/१. गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे ४११००४, येथील मुख्य कार्यालयात सादर करावे - दि. 15 जून, 2024 ते 30 जुलै, 2024 (सायंकाळी 6.15 वा. पर्यंत) कार्यालयीन वेळेत.
टीप:- ऑनलाइन (Online) स्वरूपातील अर्जाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज सादर केल्यास तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी वरील नमूद कालावधीतच अर्ज दाखल करण्याची दक्षता घ्यावी.
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांत पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी) अभ्यासक्रमाकरिता QS (Quacquareli Symonds) World Ranking 200 च्या आत रॅन्कींग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता नियोजन विभाग, शासन निर्णय दि. 20 जुलै 2023 नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्याकडून सर्वेक्षण
हे ही वाचा: आशा सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट
'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?
कर्मचाऱ्यांच्या वाढीव भत्ता, डीए मध्ये भरघोस वाढ!