आनंदाची बातमी! NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय! | Regularisation Of NHM Contractual Employees GR

Regularisation Of NHM Contractual Employees GR : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करुन त्यामध्ये रिक्त होणा-या समकक्ष पदांवर, सरळ सेवेने ७० टक्के व समावेशनाने ३० टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत, सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक १४ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला आहे.

Regularisation Of NHM Contractual Employees GR

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाबाबत विविध संघटनांशी मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८.०८.२०२३ व दि. ३१.१०.२०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या. 

त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्यापैकी सरळसेवेने ७० टक्के व उर्वरित ३० टक्के पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत किमान १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी (तांत्रिक/अतांत्रिक) कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याकरीता वयाची अट शिथील करणे व आरोग्य विभागातील नियमित पदांकरीतांचे सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा यांनी दि.०७.११.२०२३ च्या पत्रान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भातील प्रस्ताव सादर केलेला होता. 

सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या संवर्गाच्या समकक्ष सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजुर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये दुरुस्ती करुन ७० टक्के पदे सरळसेवेने व ३० टक्के पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील कंत्राटी कर्मचा-यामधून समायोजनाने भरण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!

आनंदाची बातमी! NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ३० टक्के पदे कंत्राटी कर्मचा-यामधून समायोजनाने भरण्याबाबत शासन निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजना संदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजुर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करुन त्यामध्ये सरळ सेवेने ७० टक्के व दरवर्षी समावेशनाने ३० टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवाप्रवेश नियमात दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  1. राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी कर्मचा-यांच्या सेवा कालावधी एवढी वयाची अट शिथिल करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  2. राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणा-या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  3. केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचा-यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सुचना / मार्गदर्शन तत्वे यांचे काटेकोरपणे पालन करुन समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  4. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांचे सेवा समायोजन मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या दिनांकापासुन लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  5. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करतेवेळी येणा-या तांत्रिक अडचणीबाबत विभागाच्या स्तरावरुन निर्णय घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे. (NHM कर्मचाऱ्यांचे समायोजन शासन निर्णय पाहा)

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 'दोन' महत्वाचे शासन निर्णय

जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार, पुन्हा नव्याने संधी

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now