महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील नेत्र शल्य चिकित्सक व स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ या पदाची दि.1 जानेवारी 2024 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 5 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या दोन महत्वाच्या शासन निर्णयानुसार प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील नेत्रशल्य चिकित्सक (वेतनस्तर एस-२३ : ६७७००-२०८७००) व स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ (वेतनस्तर एस-२३ : ६७७००-२०८७००) या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची दि.1 जानेवारी 2024 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर ज्येष्ठतासूची पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दि.०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरूद्ध राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर ज्येष्ठतासूची महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात आलेली आहे.
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक वाढीव मोबदला शासन निर्णय पाहा