Employee Transfer : राज्यातील शिक्षण विभागातील बदलीपात्र (गट-ब) अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी दिनांक 4 जून 2024 रोजीच्या निर्णयानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ९ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे गट-ब चे अधिकारी तसेच गट-क व ड मधील कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण लागू केले आहे. त्यानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे बदलीबाबतची प्रक्रिया पार पाडावयाची असल्याने रिक्त पदांची यादी व बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यासाठी व बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून पसंती मागविण्यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा)/शिक्षण सक्षमीकरण शाखा, गट ब मधील उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक सा.रा.से. संवर्गातील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बदलीपात्र अधिकाऱ्यांनी विवरणपत्र-१ नुसार विहित केलेल्या नमुन्यामध्ये पसंतीक्रमाची माहिती आयुक्त शिक्षण यांच्याकडे दिनांक ७ जून, २०२४ पर्यंत मागविण्यात आली आहे. बदली संदर्भात अर्ज पसंतीक्रम देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिनांक ४ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. (अधिक माहितीसाठी शासन निर्णय वाचा)
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक वाढीव मोबदला शासन निर्णय पाहा