विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

New Academic Year School Start Date In Maharashtra 2024 : उन्हाळी सुट्टीच्या दीर्घ कालावधी नंतर आता राज्यातील शाळा पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत शिक्षण संचानालयाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

New Academic Year School Start Date In Maharashtra 2024

यावर्षी राज्यातील तापमानामध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्वत्र उष्णतेची लाट पसरली होती, राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दि.2 मे, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

जून महिना सुरु होताच चाहूल लागते ती म्हणजे पाऊस आणि नवीन शैक्षणिक वर्षाची, तर यंदा महाराष्ट्र राज्यातील (विदर्भ वगळता) इतर जिल्ह्यातील शाळा दिनांक 15 जून  2024 पासून पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. मात्र विर्दभातील विद्यार्थ्यांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी मिळणार आहे.

New Academic Year 2024-25 मध्ये शाळा पुन्हा सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि. 15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.

विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याची मोठी सुट्टी!

जून महिन्यातील विदर्भाचे तापमान जास्त असल्यामुळे, उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर विदर्भातील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे, त्यामुळे अजून विर्दभातील विद्यार्थ्यांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी मिळणार आहे. (परिपत्रक)

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन गणवेश! 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू, कोणत्या दिवशी कोणता गणवेश? वेळापत्रक पाहा

MHT CET 2024 LIVE निकाल (नवीन तारखा) येथे पाहा

पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना मोठा दिलासा!

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now