महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्जासाठी 'आता' शेवटची मुदतवाढ; या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज..

RTE Admission 2024-25 Maharashtra Last Date : राज्यातील आर टी ई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी आता 4 जून पर्यंत शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.

RTE Admission 2024 25 Maharashtra Last Date

RTE Admission 2024-25 : शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी आरटीईच्या कोट्यातून राज्यातील नामांकित खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 25% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे, या जागांवर आर टी ई अंतर्गत बालकांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण ही मोफत दिले जाते.

यंदा मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर आर टी ई ची प्रवेश प्रक्रिया ही दिनांक 17 मे 2024 पासून पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे, RTE Portal वर पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी दिनांक ती 31 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र आता RTE Admission 2024-25 Online Application करिता दिनांक 4 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, मात्र यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही, तेव्हा पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्यांचा ऑनलाईन अर्ज दिनांक 4 जून 2024 पर्यंत भरून घेण्याचे आवाहन शिक्षण संचानालयाने  केले आहे.

RTE लॉटरी निकाल Live येथे पाहता येणार

SCERT Maharashtra Live (RTE Lottery) Programme Click Here

'आरटीई' प्रवेशासाठी 2 लाख 30 हजार 563 ऑनलाईन अर्ज

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 9 हजार 210 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 161 जागांसाठी आतापर्यंत  2 लाख 18 हजार 635 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे. आता RTE साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 4 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.

District RTE Schools Vacancy Total App.
Ahmadnagar 357 3023 6986
Akola 197 2014 4714
Amravati 232 2396 6361
Aurangabad 574 4451 14420
Bhandara 90 763 1868
Bid 249 2149 5459
Buldana 234 2581 4962
Chandrapur 199 1516 2881
Dhule 105 1137 2752
Gadchiroli 66 484 818
Gondiya 132 903 2860
Hingoli 114 805 1660
Jalgaon 283 3033 7366
Jalna 299 1920 4742
Kolhapur 325 3032 3642
Latur 215 1865 5433
Mumbai 261 4534 9167
Mumbai 70 1455 --"--
Nagpur 655 6920 19619
Nanded 267 2601 8486
Nandurbar 54 419 805
Nashik 428 5271 13981
Osmanabad 122 1013 2231
Palghar 265 4773 3495
Parbhani 206 1564 2896
Pune 970 17714 46350
Raigarh 264 4008 7023
Ratnagiri 97 812 738
Sangli 233 1901 2248
Satara 222 1826 3381
Sindhudurg 45 293 150
Solapur 291 2464 4960
Thane 643 11377 18767
Wardha 126 1215 2881
Washim 109 953 1923
Yavatmal 211 1976 4538
Total 9210 105161 230563

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा - RTE Online Application Status

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर पालक आपल्या अर्जाची स्थिती RTE Portal वरील Application Status या टॅब वर पाहू शकता.

स्टेप १ : Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

स्टेप २ : तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप ३ : आता Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती पहा.

RTE Admission Portal Official Website Link : https://student.maharashtra.gov.in/

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज - पालकांकरीता सूचना (2024-2025)

अबब! रेल्वेचा तब्बल 63 तासांचा 'Jumbo Block' या तारखेपर्यंत

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now