BPNL Recruitment 2024 : भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेड अंतर्गत तब्बल 5 हजार 250 रिक्त पदांची भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवरांकडून www.bhartiyapashupalan.com या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
देशभरात पशुसंवर्धन महामंडळाच्या दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन योजनांना चालना देण्यासाठी, ब्लॉक/तहसील स्तरावर "पशुपालन सेवा केंद्रे" उघडण्यात येणार आहे.
या केंद्रांद्वारे, महामंडळ उत्पादनांची विक्री आणि दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन योजनांची स्थापना आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
याकरिता पशुसंवर्धन महामंडळाकडून स्थानिक ग्रामसभा/पंचायत स्तरावर काम करण्यास इच्छुक व पात्र उमेवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन महामंडळ अंतर्गत रिक्त पदांचा तपशील व पगार
1) फार्मिंग प्रबंधन अधिकारी
- एकूण जागा - 250
- पगार - 31,000/-
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
2) फार्मिंग विकास अधिकारी
- एकूण जागा - 1250
- पगार - 28,000/-
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही विषयात 12वी उत्तीर्ण आवश्यक
3) फार्मिंग प्रेरक
- एकूण जागा - 3750
- पगार - 22,000/-
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात 10वी उत्तीर्ण आवश्यक
उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
टीप:- महामंडळाचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रवास भत्ता, दैनंदिन भत्ता, गृहनिर्माण भत्ता इत्यादी लाभ नियमानुसार दिले जातील.
जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर; जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक
- या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून, उमेदवारांच्या मोबाईलवर किंवा सायबर कॅफे द्वारे ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे.
- उमेदवारांना नोंदणीकृत ईमेलवर ऑनलाईन परीक्षेची तारीख आणि वेळ ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखेपासून ३० दिवसांनी पाठवले जाईल.
- निवड झाल्यानंतर नियमानुसार कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर मासिक वेतन आणि लाभ मिळणार आहे.
- निवड झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारासाठी 2.5 लाख रुपयांचा एक वर्षाचा वैयक्तिक अपघात विमा मोफत दिला जाणार आहे.
- अंतिम निवडलेल्या उमेदवारांना जिल्हा/तालुका/तहसील/ग्रामपंचायतीमध्ये पदानुसार नियुक्त केले जाणार आहे.
पशुसंवर्धन विभाग भरती जाहिरात | BPNL Recruitment 2024 Notification PDF
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी, सविस्तर तपशील मूळ जाहिरातीत दिलेल्या सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करावा.
BPNL Recruitment 2024 : Notification PDF Click Here
BPNL Official Website : https://www.bharatiyapashupalan.com/
Online Application Form : https://pay.bharatiyapashupalan.com/onlinerequirment
MHT CET 2024 LIVE निकाल येथे पाहा