Contractual Employees : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन होणार, सेवेत सामावून घेण्यासाठी 120 दिवसाची मुदत..

Contract Basis Employees Regularization: साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे बाबतचा महत्त्वपूर्ण निकाल मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

Contract Basis Employees Regularization

संपूर्ण जगभरातील भाविकांचे (साईबाबा) श्रद्धास्थान म्हणजे शिर्डीचे साईबाबा संस्थान, या संस्थांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षापासून कर्मचारी करार पद्धतीने काम करत आहे, सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी या प्रमुख मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले आहेत, एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये 2021 मध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी 120 दिवसाची मुदत

या याचिकेवरील सुनावणीनुसार साईबाबा संस्थान मध्ये गेल्या दहा वर्षापासून जे कर्मचारी काम करत आहे, त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे असा महत्वपूर्ण निकाल दिनांक 9 मे रोजी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी 120 दिवसाची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे साईबाबा संस्थानच्या जवळपास 1 900 कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे.

सध्या या निकालानंतर साईबाबा संस्थानच्या कामगार विभागातून कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळ सुरू असून हा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर शासन स्तरावरून या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कायमस्वरूपी नियमित करण्याबाबतचा आदेश मिळण्याची अपेक्षा आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार, पुन्हा नव्याने संधी

सलग 10 वर्ष काम केलेल्या त्या 598 कंत्राटी कर्मचा-याची सेवा विचारात घेतली जाणार

साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचारी (५९८) यांना संस्थान सेवेत नियमित नेमणूका देऊन वेतनश्रेणी लागू करणेस मान्यता मिळणेकामी मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल करणेत याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालयाचे दि.०९/११/२०२३ रोजीच्या आदेशात मागील सलग १० वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचा-याची सेवा विचारात घेतली जाईल, असे नमूद आहे. त्यास अनुसरुन दि.०१/११/२०१३ ते दि.३१/१०/२०२३ या कालावधीत सलग १० वर्षे कामावर कार्यरत कर्मचा-यांचा हजर दिवसांचा गोषवारा व सेवाजेष्ठता यादी संस्थांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मोठा निर्णय!

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्जासाठी 'आता' शेवटची मुदतवाढ : या तारखेपर्यंत करा अर्ज

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now