Employees Salaries Funds Sanctioned: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे माहे मे व जून २०२४ महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे, तसा शासन निर्णय दिनांक १७ मे २०२४ रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे.
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अधिकारी, कर्मचारी यांचे मे व जून २०२४ या महिन्याच्या वेतनाकरिता एकुण रु.७०००,०० लक्ष (रुपये सत्तर कोटी फक्त) इतका निधी वितरित व खर्च करण्यास दिनांक १७ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
पोषण आहार, विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अंगणवाडी सेवा (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (कार्यक्रम), महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ यांच्या कलम १२३ व २६१ अन्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा १००% , सहायक अनुदाने (वेतन) इ साठी सदरचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना मोठा दिलासा!
पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार, पुन्हा नव्याने संधी