Anganwadi Workers Salary : अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांच्या 'मे' महिन्याचा पगारासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असल्याने, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात येतो, मात्र केंद्राकडून सदर निधी वेळेत प्राप्त होत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा यासाठी पुढील निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेत करणे शक्य व्हावे, यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास संबंधित विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे २०२४ या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता एकूण रुपये १६५००.०० लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली असून, आता लवकरच मे महिन्याचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (शासन निर्णय)
एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचे या दोन महिन्याच्या पगारासाठी निधी मंजूर - पत्र पहा
राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 4 टक्के वाढ!
कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार, पुन्हा नव्याने संधी
जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर; जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक