7th Pay Commission DA Hike: राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तसेच महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ कधी होणार?
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेला 4 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 1 जानेवारी 2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे.
आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णयाकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, लवकरच आचारसंहिता संपताच याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होणार आहे, त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ निहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा
मोठी अपडेट! सातव्या वेतन आयोगानुसार 'आता' सुधारित वेतनश्रेणी लागू होणार - परिपत्रक