सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला, ग्रॅच्युइटीचीही मर्यादा वाढली | 7th Central Pay Commission DA Hike

7th Central Pay Commission DA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के प्रमाणे लागू करणे, तसेच (Gratuity) ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा वाढवून लाभ देण्याबाबत महत्वाचे परिपत्रक निवृत्ती वेतन कल्याण विभागाने जारी केले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ!

7th Central Pay Commission DA Gratuity Hike

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 4 टक्क्यांनी वाढवला असून, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 50 टक्के झाला आहे. सदरचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी 2024 पासून देण्यात येणार असून, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ करण्यात आली आहे.

महागाई भत्ता वाढीचा (DA Hike) लाभ हा देशभरातील 49.18 लाख कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तिवेतनधारकांना झाला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार 869 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. तसेच प्रवास भत्ता, कँटीन व प्रतिनियुक्ती भत्ता 25 टक्के व ग्रॅच्युइटी लाभ 25 टक्के वाढवला आहे.

या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी  करण्याकरिता केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन कल्याण विभागाने कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता वाढ तसेच ग्रॅच्युईटी लाभ एकरकमी देताना सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करिता खालीलप्रमाणे  आहेत.

  1. सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना महागाई भत्त्याचे दर मूळ वेतनाच्या 46% वरून 50% पर्यंत वाढवण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सदरचा लाभ हा दि. 1 जानेवारी 2024 पासून देण्यात यावा.
  2. सातव्या वेतन आयोगानुसार (7th Central Pay Commission) केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 अंतर्गत सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही 1 जानेवारी 2024 पासून 25% ने वाढवले जातील, म्हणजे 20.00 लाख रुपयांवरून 25.00 लाख रुपये याप्रमाणे लाभ देण्यात येईल. (निवृत्ती वेतन कल्याण विभागाचे परिपत्रक पहा)

राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 4 टक्के वाढ!

मोठी अपडेट! सातव्या वेतन आयोगानुसार 'आता' सुधारित वेतनश्रेणी लागू होणार - परिपत्रक

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now