ITI Admission 2024 : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना दिनांक 30 जून 2024 पर्यंत https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेटबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक DVET कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 10 वी नंतर 11 वी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अशा पदविका अभ्यासक्रमांकडे न वळणारे विद्यार्थी ITI अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024-25 सुरु होण्याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली होती, आता ITI ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक 3 जून ते 30 जून 2024 पर्यंत https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
राज्यामध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून (dvet) आयटीआय पदविका अभ्यासक्रमाची प्रक्रिया राबवण्यात येत असून, यावर्षी 1 हजार 26 आयटीआय कॉलेजमध्ये 1 लाख 48 हजार 568 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असणार आहेत.
आयटीआय प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक । ITI Admission Time Table 2024-25
- DVET ने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर 5 जून ते 1 जुलै 2024 या कालावधीत कागदपत्रांच्या पडताळणी करून प्रवेश अर्जाची निश्चिती करावी आहे.
- त्यांनतर 5 जून ते 2 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना ITI संस्थांचे पर्याय निवडता येणार आहेत.
- दिनांक 4 जुलै 2024 रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
- दिनांक 4 आणि 5 जुलै 2024 रोजी प्राथमिक गुणवत्ता यादीबाबतचे आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येतील.
- त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 7 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- पहिल्या फेरीसाठी दिनांक 14 जुलैला उमेदवारांना SMS पाठविण्यात येईल, व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- दिनांक 15 ते 19 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या संस्थेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल.
- ITI प्रवेशाची दुसरी फेरी दिनांक 15 जुलैपासून सुरू होईल.
आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा
ITI प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक येथे पहा
ITI प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी : https://dte.maharashtra.gov.in/
MHT CET 2024 LIVE निकाल (नवीन तारखा) येथे पाहा
ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
सरकारी नोकरीची संधी! MPSC मध्ये नवीन भरती