राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली.
अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahan Yojana योजनेसाठी दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी 1 जुलै, 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय । Mazi Ladki Bahin Yojana GR
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबतचा महत्वपूर्ण (Mazi Ladki Bahin Yojana GR) शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला असून, या योजनेचा लाभ कार्यपद्धती विषद करण्यात आली आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय येथे पाहा
राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय! भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार
विधानभवनाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.
आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारकडून खुलासा
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तारांकित प्रश्नावर सरकारचा खुलासा पाहा
महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.
मोठी बातमी! 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार