Old Pension Scheme GR: दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत 3 महत्वाचे शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
केंद्र शासनाच्या अधिकारी , कर्मचारी याची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात, भरतीची, नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२ डिसेंबर २००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.०१ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी , कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२, २०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी, कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. व त्यांची पदभरतीची जाहिरात, अधिसूचना दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
राज्यातील आशा स्वयंमसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचारी लेटेस्ट अपडेट पाहा
अशा राज्य शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) निर्णय 2 फेब्रुवारी 2024 घेण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
या निर्णयानुसार आता उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत.
त्यानुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे 3 महत्वपूर्ण शासन निर्णय
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!