Anganwadi News: राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

Anganwadi News: राज्यातील अंगणवाडी संदर्भात आवश्यक सेवा सुविधा, नवीन अंगणवाडी सुरू करणे, अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ व इतर महत्वाच्या समस्यांबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेतली, या बैठकीतील सविस्तर मुद्दे पाहा

पोषण आहार लाभार्थीच्या मानधनात वाढ होणार

Anganwadi News

बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून 6 वर्षांखालील बालकांना, गरोदर महिलांना, स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रतिलाभार्थी 8 रुपये मानधन देण्यात येते, त्यामध्ये वाढ करून 12 रुपये मानधन देण्यात यावे  अशी विनंती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन केली.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी केंद्राकडे मागणी  

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, पोषण आहार प्रतिलाभार्थी 12 रुपये  दरवाढ दिली तर  बालकांना चांगला आहार आणि बचतगटांना आर्थिक मदत होईल. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य हिस्सा प्रमाणे  केंद्राचा हिस्सा मिळाला तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येईल.

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय!

पावसाळी अधिवेशनात आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न

 नोकरीच्या ठिकाणी मिळणार निवासाची व्यवस्था

नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते. अशावेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी  केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार

राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू शासन निर्णय पाहा 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ

राज्यात नवीन 8 हजार 84 अंगणवाड्या सुरू होणार

विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार ८४ अंगणवाड्यांची मागणी असून, यासाठी  मान्यता देण्याबाबतचा  प्रस्तावही  केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे  मंत्री तटकरे यांनी दिला. 

रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय!

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना मोठा दिलासा!

अंगणवाडीमध्ये आता नवीन इलेक्ट्रॉनिक साधने मिळणार

अंगणवाडीमध्ये सध्या जी वृद्धी सहनियंत्रण साधने ( Growth monitaring Devices)  वापरण्यात येत आहेत. ती जुन्या पद्धतीची असून आयआयटीने विकसित केलेले अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वृद्धी सहनियंत्रण साधने तातडीने  उपलब्ध करून देण्यात यावीत. या साधनांचा वापर केला तर कामामध्ये सुलभता, अचूकता येईल आणि वेळेची बचतही होईल. महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो निधी दिला जातो  तो तातडीने देण्यात यावा. अशी विनंतीही मंत्री कु. तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली.

आरोग्य विभागातील 'या' कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत महत्वपूर्ण बैठक

अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित 

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या संदर्भात


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now