विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला दिनांक 27 जून पासून सुरुवात झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सदनांत सकाळी अकरा वाजता वंदेमातरम् आणि राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली.
राज्यातील पोलीस भरती संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वेधले सरकारचे लक्ष
- आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस भर्तीसाठी आलेल्या उमेदवारांची शासनानं योग्य व्यवस्था न केल्याचं सांगत या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं.
- भर्तीसाठी आलेल्या उमेदवारांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे, तसे निर्देशही सगळ्या विभागांना देण्यात आले आहेत असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं.
- मात्र जर काही ठिकाणी अजूनही व्यवस्था झाली नसेल तर पुन्हा एकदा सूचना देऊन ती करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.
माजी राज्यमंत्री गंगाधरराव गाडे तसंच माजी विधान परिषद सदस्य मधुकर देवळेकर, मधुकर वासनिक, वसंत मालधुरे, वसंतराव ढोबळे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करत सदनानं त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय कधी? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्वाची माहिती
विधानसभेतील या सदस्यांनी राजीनामा दिल्याची माहिती
विधानसभेत गेल्या वित्तवर्षासाठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला, तत्पूर्वी, संदीपान भूमरे, वर्षा गायकवाड , राजू पारवे, निलेश लंके, प्रतिभा धानोरकर ,रवींद्र वायकर, प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी राजीनामा दिल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली.
या अधिवेशन काळासाठी कालिदास कोळंबकर, संजय शिरसाट , अमीन पटेल, किरण लम्हाटे आणि समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय
विधान परिषदेतल्या 'या' सदस्यांना निरोप
विधान परिषदेतले सदस्य सुरेश धस, प्रवीण पोटे-पाटील, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे आणि विप्लव बाजोरिया २१ जूनला निवृत्त झाले. या पाच सदस्यांचा निरोप समारंभ आज विधिमंडळातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला.
निवृत्त सदस्यांनी, लोकसेवा करण्यासाठी पुन्हा विधानपरिषदेत येण्याचा निर्धार आणि निश्चय करावा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं. हे निरोपाचं नाही तर निर्धाराचं आणि निश्चयाचं अधिवेशन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
तर, वरिष्ठ सभागृह म्हणून या सभागृहाची महती जास्त आहे, अशा सभागृहात सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही बाब उल्लेखनीय आहे, असं मनोगत निवृत्त सदस्यांनी यावेळी व्यक्त केलं.
या समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
निवृत्त झालेल्या, पाचही सदस्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध