National Health Mission Bharti: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत Staff Nurse (Female) , MPW (Male) या पदांसाठी आरोग्य विभाग, जि.प. लातूर अंतर्गत विविध पदांच्या पदभरती करीता अर्ज मागविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
- पदाचे नाव
- Staff Nurse (Female)
- MPW (Male)
- एकूण जागा : 61
- शैक्षणिक अहर्ता स्टाफ नर्स (महिला) : GNM / B.Sc नर्सिंग तसेच उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- शैक्षणिक अहर्ता MPW (पुरुष) : विज्ञान विषयात 12वी उत्तीर्ण.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024
- अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
निवड प्रक्रिया
जाहीरातीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या पदाकरीता नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेवून मुलाखतीकरीता 1:5 Cut & Off खालीलप्रमाणे लावण्यात येईल.
वरील पदाकरीता गुणांकन खालीलप्रमाणे राहील
- शैक्षणिक अंतिम वर्षाचे गुणांच्या ५० टक्के
- पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास २० गुण अतिरिक्त देण्यात येतील.
- वरील पदाकरीता उमेदवारांस शासकीय अनुभव असल्यास प्रत्येक १ वर्षाकरीता ६ गुण त्यानूसार जास्तीत जास्त ३० गुण देण्यात येतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अटी व शर्ती खालीलप्रमाणे
- अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त नसावे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 05/07/२०२४ राहील. सदर अर्ज कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील.
- लेखी परीक्षेस अयवा मुलाखतीस आलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास/दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. उमेदवाराने स्वखचर्चाने लेखी किंवा मुलाखतीस उपस्थित राहावे.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहील.
- अर्जावर सद्यस्थितीत चालु असलेला ई मेल आयडी व मोबाईल नंबर नोंदवीणे बंधनकारक राहिल.
- संपूर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत ई मेल आयडी व मोवाईल नंबर चालु स्थितीत राहण्याची दक्षता उमेदवारांनी घेण्यात यावी.
- पात्र उमेदवारास लेखी किंवा तोंडी परिक्षेसाठी / मुलाखतीसाठी / कागदपत्र तपासणीसाठी ई मेल द्वारे व जि.प. लातूर च्या वेबसाईटद्वारे कळविण्यात येईल.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत एकत्रित मासिक मानधनावर पदभरती करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर जाहीरात व अर्जाचा नमुना http://zplatur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सविस्तर अटी व शर्तीसाठी मूळ जाहिरात पहा
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे zplatur.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात