आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या मदतीने राबविण्यात येणार, मिशन धाराऊ अभियान

Mission Dharau Abhiyan: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मिशन धाराऊ अभियानाचा आढावा घेऊन, सदर अभियान संपूर्ण राज्यभर राबवण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मदर सपोर्ट ग्रुप ची निर्मिती करण्यात येणार आहे, यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, प्राथमिक शिक्षिका, ग्रामसेविका, महिला लोकप्रतिनिधी व इतर तज्ञ स्थानिक महिला यांचा समावेश या ग्रुपमध्ये असणार आहे.

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या मदतीने राबविण्यात येणार, मिशन धाराऊ अभियान

Mission Dharau Abhiyan

राज्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, स्तनपान व शिशुपोषण याबाबत शास्त्रोक्त ज्ञानाद्वारे आनंदी मातृत्वाची संकल्पना समाजामध्ये रूजवण्याच्या उद्देशाने विविध शासकीय व अशासकीय घटकांच्या समनव्यातून सातारा जिल्ह्यामध्ये 'मिशन धाराऊ माता- दुग्धमृतम' ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे.  

ही योजना शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून सामाजिक लोकचळवळ म्हणून संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी नियोजन करावे असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आशा स्वयंमसेविका लेटेस्ट अपडेट पाहा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात निर्णय

बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. 

राज्यातील 'या' कामगारांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार - मुख्यमंत्री

अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा शिल्यचिकित्सक, युनिसेफ, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन,बीपीएनआय (महाराष्ट्र) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, स्थानिक अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ म्हणून जनजागृती केली पाहिजे अशी सूचना केली.

आशाताईंना मिळाला सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार!

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजनासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मदर सपोर्ट ग्रुपची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये  प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका,  प्राथमिक शिक्षिका, ग्रामसेविका महिला, लोकप्रतिनिधी व इतर तज्ञ स्थानिक महिला यांचा समावेश मदर सपोर्ट ग्रुपमध्ये करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! विविध मागण्यासंदर्भात बैठकीत महत्वाचे निर्णय

यावेळी महिला  व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजने आयुक्त कैलास पगारे, सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा

कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन होणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now