रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
या महामंडळाच्या अंतर्गत प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येणार असून, सदर कामगारांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तरतूद करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार - मुख्यमंत्री
अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे, तसंच ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती तसंच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यांच्या मुलांना कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केलं जाईल, तसंच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! विविध मागण्यासंदर्भात बैठकीत महत्वाचे निर्णय
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका महिला कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
वय 63 वर्षावरील चालकांना ग्रॅज्युटी (Gratuity) मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो यापुढं आकारला जाणार नाही. मात्र त्यासोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन होणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी