राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!

Employees Latest News: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधींसह राज्याच्या मुख्य सचिव पातळीवर  दिनांक 25 जून रोजी मंत्रालयात मा. मुख्य सचिवांच्या दालनात बैठक संपन्न झाली. या बैठकीस संबंधित विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत खालील प्रमाणे निर्णय संघटनेच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात  घोषित करण्यात आले आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!

Employees Latest News

सदर बैठकीत खालील मुद्दा क्रमांक 12 नुसार राज्यातील कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबविले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच  सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव १ मार्च २०२४ पासूनच ! राज्याच्या मुख्य सचिवांचा निर्वाळा !

  1. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दि. १ मार्च २०२४ पासूनच राहील व त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाळा मा. मुख्य सचिव श्री. नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिला.
  2. केंद्राप्रमाणे चार ४% महागाई भत्ता वाढ सत्वर मंजूर करण्यात येईल.
  3. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे बाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे.
  4. निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम बारा वर्षाने पुनस्र्थापित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.
  5. वार्षिक नियतकालीन बदल्यां संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र विनंती बदल्या संदर्भातील प्रकरणे मा.मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढली जातील.
  6. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागांकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार केला जाईल. वाहन चालक रिक्त पदभरतीबाबत सद्यस्थितीचा अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल.
  7. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत सद्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे आहे. प्रतिक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचा अनुकंपा नियुक्तीबाबत विचार केला जाईल.
  8. सेवानिवृत्ती उपादान रु. १४ लाखांऐवजी रु. २५ लाख निश्चित करण्यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
  9. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे धोरण सद्या राबविले जात आहे.
  10. अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नाचावत नव्याने अभ्यास केला जाईल.
  11. शासकीय महिला कर्मचाऱ्यांना वाढीव बाल संगोपन रजा देता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल.
  12. कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबविले जात आहे.
  13. दि. २ फेब्रुवारी २०२३ च्या अधिसूचनेवावत तसेच ड वर्ग कर्मचाऱ्यांची क वर्ग संवर्गात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कालबध्द पदोन्नती संदर्भातील समस्येबाबत वित्त विभागात चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. 
  14. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांचे सेवांतर्गत प्रश्न, जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (१२:२४) व बक्षी १४. समितीत शिफारस केल्यानुसार (१०:२०:३०) तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै २०२४ मध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करुन योग्य निर्णय घेतले जातील.

आशा गटपर्वतक, अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी लेटेस्ट अपडेट

मा. मुख्य सचिवांनी व इतर उपस्थित विभागीय सचिवांनी खुल्या मनाने चर्चा केल्याबद्दल त्यांचे संघटनेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. उपरोक्त चर्चेचे नेतृत्व मध्यवती संघटनेचे सरचिटणीस तसेच समन्वय समितीचे निमंत्रक श्री. विश्वास काटकर यांनी केले.

शासन सेवेत नियमित करण्याचा शासन निर्णय पाहा

सविस्तर इतर विषय - बैठकीचे इतिवृत्त पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या संदर्भात

जिल्हा परिषद भरतीचे अंतिम टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय येथे पाहा वेळापत्रक व हॉल तिकीट


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now