आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न

कंत्राटी तत्वावर असलेल्या सहाय्यक आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबतचा आतारांकित प्रश्न राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता, यानुषंगाने सरकारकडून मुख्यमंत्री यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

आतारांकित प्रश्नावर सन्माननीय मुख्यमंत्री यांनी खालीलप्रमाणे खुलासा केला आहे. 

  1. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये व कोविड लसीकरण केंद्रांमध्ये कोविड लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०२१-२२ करिता कंत्राटी पध्दतीने परिचारीकांची (लसटोचक) नियुक्ती करण्यात आली होती.
  2. तसेच, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर बाह्य लसीकरण सत्रासाठी प्रतिसत्र मानधनावर लसटोचक अशी नेमणूक करण्यासाठी विविध स्थानिक वृत्तपत्रांत दिनांक २१.१२.२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि सदर जाहिरातीस प्रतिसाद न लाभल्यामुळे कंत्राटी लसटोचकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
  3. बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत सहाय्यक आरोग्य सेविका असे पद अस्तित्वात नाही. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये साह्यकारी परिचारीकांची (प्रसविका) या संवर्गाची ४२१ पदे रिक्त आहेत. (२), (३) व (४) सदर साह्यकारी परिचारीकांची (प्रसविका) ४२१ रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक ९ जानेवारी, २०२३ मध्ये सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जाची छाननी व पडताळणी पूर्ण झालेली आहे. तदनुसार उमेदवारांना पात्र / अपात्र करुन प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्यात आला असून, मंजुरी प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित पध्दतीने नियुक्ती देण्यात येणार आहे.
  4. कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कोणतेही धोरण नाही. तथापि, कंत्राटी तत्वावरील लसटोचक, साह्यकारी परिचारीका (प्रसविका) या पदाची अर्हता धारण करीत असल्यास ते अर्ज करण्यास पात्र राहतील व गुणवत्तेनुसार त्यांची निवड करण्यात येईल.
  5. प्रश्न उद्भवत नाही.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार

राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू शासन निर्णय पाहा 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ

asha sevika atarankit prashn

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

राज्यातील आशा स्वयंमसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचारी लेटेस्ट अपडेट पाहा

Post a Comment (0)