राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन, सुविधा तसेच इतर मागण्या शासनस्तरावर अद्यापही प्रलंबित असल्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, यावर महिला व बालविकास मंत्री यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात - विधानसभेत तारांकित प्रश्नावर सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा
प्रश्न : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण आदिवासी व शहरी भागात सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस याचे मानधन प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०२४ च्या तिसऱ्या आठवडयात वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय, यावर सरकारकडून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे.
खुलासा: राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे मार्च, २०२४ चे मानधन दिनांक २२.४.२०२४ रोजी अदा करण्यात आले आहे. त्यानंतर माहे एप्रिल व मे, २०२४ या महिन्यांचे मानधन देखील अदा करण्यात आले आहे.
गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा
कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
प्रश्न : अंगणवाडी सेविकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी दिनांक ३ जानेवारी, २०२४ रोजी वा त्यासुमारास मुंबईतील आझाद मैदानामध्ये मोर्चा काढून आंदोलन केलेले होते, हे ही खरे आहे काय,
खुलासा: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत त्यांच्या संघटनासमवेत बैठक आयोजित करुन कार्यवाही करण्यात येते. तद्नुषंगाने दिनांक २५.१.२०२४ रोजी झालेल्या बैठकीनुसार अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
दिनांक 19 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात अपडेट
प्रश्न: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन, सुविधा तसेच इतर मागण्या शासनस्तरावर अद्यापही प्रलंबित असल्याबाबत
खुलासा: राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचेकडून करण्यात येणाऱ्या विविध मागण्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते.
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय!
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात