अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली, यादरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहे.

mukhyamantri-majhi-bahin-yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी आणि सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी असे निर्देश या बैठकीत दिले.

अंगणवाडी सेविकाना प्रोत्साहन भत्ता शासन निर्णय येथे पाहा

गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी

नारी शक्ती दूत’ (Nari Shakti Dut) ॲप सुरू - अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र

लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील. महिला भगिनी या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यानतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत. तसेच, ज्या पात्र महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ (Nari Shakti Dut) हे ॲप सुरू करण्यात येत आहे. 

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

अखेर! राज्यातील या करार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ!

अधिक सविस्तर माहितीसाठी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय येथे पाहा

सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. यासाठी गावपातळीवर विशेष शिबीरांचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे. तसेच, जिल्हापातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

आशा सेविका संदर्भात लेटेस्ट अपडेट येथे पाहा

महाज्योती मार्फत मिळणार मोफत टॅब, 6 GB इंटरनेट डाटा; ऑनलाईन अर्ज येथे करा

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी अशा सूचनाही या बैठकीत दिल्या.   

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now