RTE News : राज्यातील RTE 25 टक्के प्रवेशासंदर्भात दिनांक 11 जुलै 2024 रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून, याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.
राज्यातील 'आरटीई' 25% प्रवेशाची अंतिम सुनावणी पूर्ण
आरटीई 25 टक्के प्रवेशासंदर्भात मा. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दि. 11 जुलै 2024 रोजी सुनावणी झाली. या सूनवणीत सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मा. न्यायलयासमोर मांडली, आता सदर सुनावणी पूर्ण झाली असून, याबाबतचा अंतिम निकाल न्यायलयाने राखून ठेवला असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतरच RTE प्रवेश प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरटीई' लॉटरी निवड यादी जाहीर होताच येथे पाहा
तुम्ही या योजनेचा लाभ घेतलाय का? अन्यथा होणार कारवाई; नेमकं कारण काय?
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा
शिक्षण हक्क 'आरटीई' योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी 9 हजार 217 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 399 जागांसाठी 2 लाख 42 हजार 913 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले असून, निवड झालेल्या बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यांची RTE Lottery Result 2024 25 PDF यादी RTE पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा दि. ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला मा. उच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे मा. न्यायालयाने RTE प्रवेशाची प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणेच राबविण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे दि १७ मे २०२४ पासून RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली होती.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे दिनांक ७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरटीई २५ टक्के प्रवेशाची सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.
मात्र मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने मा. न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी, अशा जाहीर सूचना RTE Portal वर देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी : https://student.maharashtra.gov.in/