कंत्राटी कर्मचारी संघटनेचा वार्षिक राज्यस्तरीय मेळावा जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेणार असल्याचे सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार
अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतंर्गत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून राज्यातील गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना मानधन १३ हजारांवरून २५ हजार करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यावेळी मानधन वाढविल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक
अबब! राज्यातील 1 लाख 262 कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश; काय आहे कारण? पाहा
दिव्यांग उपक्रमांच्या अनुदानबाबतचे धोरण मंजूर – मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची रविवारी जळगाव येथे वार्षिक राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट येथे पाहा
कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्याध्यक्ष विलास निकम, राज्य सचिव जयंत वर्मा, राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र महाजन व शिरीष तायडे यांनी केले. प्रास्ताविक राज्याध्यक्ष विलास निकम यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष सपना राजपूत यांनी मानले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट येथे पाहा
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा
दिनांक 19 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात अपडेट
गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी