राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गटप्रवर्तकांच्या विविध मागण्याबाबत चर्चा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत आ. चिमणराव पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांची याबाबत भेट घेतली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गटप्रवर्तकांच्या विविध मागण्याबाबत चर्चा

nhm gatpravaratak

राज्यातील गटप्रवर्तकांच्या मानधनात १० हजार रुपये वाढ करणे, संपकाळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करणे, या मागण्या मंजूर होणेबाबत मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी आ.चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती. या मागणीबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांची आमदार चिमणराव पाटील यांनी भेट घेत या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. दि.१४ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे. 

गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन, NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत समायोजन बाबत..

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा

आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न

सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहेत. संपादरम्यान गटप्रवर्तकांना ६२००/- रुपये व मा.मुख्यमंत्री महोदयांचा यांच्या सूचनेनुसार त्यात रु.३८००/- ची आणखी भर घालून दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट

गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासह अन्य मागण्या मान्य करून गटप्रवर्तकांच्या न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांचेकडे केली आहे. 

राज्यातील या विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now