उमेद-महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने ८४ लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या शाश्वत विकासासाठी बेमुदत धरणे आंदोलन व महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी मा. आ. अशोक पवार, विधानसभा सदस्य, शिरूर हवेली यांनी भेट देऊन संबंधित प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या, काय आहेत मागण्या पुढे वाचा..
- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे.
- उमेद अंतर्गत सध्या कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे.
- प्रभागसंघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभागसंघ व्यवस्थापक यांचे इतर अभियानातील केडर प्रमाणे मानधनवाढ करावी व वर्धिनी यांना देखील पूर्णवेळ काम देण्यात यावे.
गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी
या मागणीसाठी उमेद-महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन व महामोर्चा काढण्यात आला होता, यावेळी मा. आ. अशोक पवार , विधानसभा सदस्य, शिरूर हवेली यांनी भेट देऊन या रास्त मागणीवर राज्य शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय!
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात