Anganwadi Latest News : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाऐवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कर्मचाऱ्यांनी शेकडोच्या संख्येत छत्री आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका (अंगणवाडी सेविका) संघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या मागण्या संदर्भात सरकारकडून खुलासा येथे पहा
त्यामध्ये म्हटले आहे की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मागील ३५ वर्षांपासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत. परंतु, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तसेच सेविकांना अनेक कामे देण्यात आली आहेत. ही सर्व कामे त्या करतात. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा तसेच वेतन देण्यात यावे. शासन महागाई वाढीनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करते. परंतु, सेविका आणि मदतनीसांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करत नाही. याबाबतच विचार व्हावा.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समकक्ष पदांवर सामावून घ्या - पहा अपडेट
गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी