नोकरीच्या संधी! पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ९ जुलै रोजी 'येथे' आयोजन

Pandit Dindayal Upadhyay Employment Fair: पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ९ जुलै रोजी आयोजन करण्यात आले असून, या रोजगार मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या कौशल्य रोजगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

नोकरीच्या संधी! पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ९ जुलै रोजी 'येथे' आयोजन

rojgar-melava

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिठागर रोड, ठाकूरवाडी, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०००८१ येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी

या मेळाव्यात  मुंबई जिल्ह्यातील सीआयआय (CII), शिंडलर(Schndilar),महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड, पेटीएम, मॅजिक बस, चाणक्य स्टाफिंग, एमईपी इन्फ्रॉस्ट्रक्चर, एलआयसी, एड्रॉमेडा सेल्स अॅन्ड डिस्ट्रीब्युशन प्रा. लि., बीटीडब्लू व्हीसा सर्व्हिस प्रा.लि., युवा शक्ती प्रा.लि. यासारख्या नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी मुलाखती होणार आहेत. 

राज्यामध्ये विविध जिल्ह्यांतर्गत भरती जाहीर, जाहिरात येथे पाहा

त्यानुसार त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास शासनाचे विविध महामंडळाच्या कर्जाच्या योजनेबाबत महामंडळाचे प्रतिनिधी माहितीसह उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १० वी नापास, १० वी पास, १२ वी पास, आय.टी.आय, पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी संबंधित पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी: https://rojgar.mahaswayam.gov.in/

दिनांक 19 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात

गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन, NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत सामावून घेण्यात यावे

अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय!

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now