RTE Latest News : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील RTE 25 टक्के प्रवेश रखडले असून, यासंदर्भात मा. न्यायलयात जून महिन्यात (दि 18) जून रोजी सुनावणी झाली होती, आता याबाबतची सुनावणी उद्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी होणार आहे.
मोठी अपडेट! राज्यातील 'आरटीई' 25% प्रवेशाची अंतिम सुनावणी उद्या ; न्यायालयाच्या निर्णयाकडे पालकांचे लक्ष
दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी, महाराष्ट्र सरकारने RTE प्रवेश प्रक्रियेत बदल केले. या निर्णयाच्या विरोधात RTE चे प्रकरण मा. न्यायलयात न्यायप्रविष्ठ आहे.
राज्यातील काही शिक्षण संस्थांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे सुनावणी लांबली होती, यामुळे राज्यातील RTE 25% प्रवेश प्रक्रियेत विलंब झाला आहे, मात्र आता याबाबतची पुढील सुनावणी उद्या होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या संदर्भात अपडेट पाहा
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील RTE प्रवेशासंदर्भात यंदा मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, मे महिन्यात आर टी ई 25% प्रवेश प्रक्रिया नव्याने पुन्हा राबविण्यात आली, त्यानंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज केले, त्यानंतर 7 जून 2024 रोजी RTE ची ऑनलाईन सोडत काढण्यात आली, मात्र लॉटरी ची निवड यादी (RTE Lottery Result 2024 25 PDF) राखून ठेवण्यात आली आहे.
आता 11 जुलै 2024 रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीत न्यायालय RTE प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. याकडे राज्यातील सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.
RTE पोर्टलवर जाहीर केलेल्या सूचनेनुसार मा. उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका(एल) क्र 14887/2024 प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत मा. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी : https://student.maharashtra.gov.in/