Monsoon session 2024: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (दि.27 जून) पासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सरकारनं सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले सर्व सदस्य, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर होणारं राज्याचं हे पहिलंच अधिवेशन आहे. येत्या २८ तारखेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे अधिवेशन १२ जुलै पर्यंत चालणार आहे.
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत '6' महत्वपूर्ण निर्णय!
राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात 'आजचा' शासन निर्णय जारी
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय
सन 2024 चे राज्य विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन
प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची दिनांक 26.06.2024 रोजी पर्यंतची यादी
- संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक :- 6
- विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके :- 1
- सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश :- 2
- प्रस्तावित विधेयके :- 5
संयुक्त समितीकडे प्रलंबित
(1) महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नौकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)
(2) महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा किटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023
(3) किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023
(4) बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023
(6) महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023