7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते मंजूर करण्यात आले आहे, आता कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत महत्वाचे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण संचालक (माध्यमिक/प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे. यांना काढले आहे. सविस्तर वाचा..
राज्यातील या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने मिळणार
NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
मा. माजी वि.प.स. श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक १९.०२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत विनंती केली आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पाहा
सन २००५ पूर्वी विनाअनुदान / अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असलेले परंतु सन २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) लागू असून यापैकी काही शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे ((NPS) खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तब्बल विविध 31 पदांच्या 90 जागांसाठी जाहिरात
सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते / परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक १०.०१.२०२० मधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि, ज्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे (NPS) खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत.
राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी
फक्त अशा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्यात यावे. असे कळविण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजना : आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? येथे चेक करा