Transport Allowance : अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरात केलेल्या सुधारणेनुसार २१६ दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाला अनुज्ञेय असणाऱ्या वाहतूक भत्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत सुधारित शासन शुध्दिपत्रक दिनांक 21 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
गुड न्यूज! करार पद्धतीने कार्यरत या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर; सुधारित शासन शुध्दिपत्रक पाहा
दिव्यांग शिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाहतूक भत्ता वाढविण्याचा आणि २० फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यातील ६ जिल्हा समन्वयक, ५२ विशेष तज्ज्ञ/ समावेशित शिक्षक व १५८ विशेष शिक्षक अशा २१६ कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुड न्यूज! रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मंजूर व रिक्त पदांवर समायोजन - शासन निर्णय पाहा
दिनांक 21 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन शुध्दिपत्रकानुसार खालील सुधारणा करण्यात आली आहे.
"सदर खर्च मागणी क्र. ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६ शिक्षक व इतर सेवा, (००) (००) (०१) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (२२०२ आय ६१२) (राज्य हिस्सा ४० टक्के) या लेखाशिर्षाखाली दिव्यांग विशेष शिक्षकांना दि.२६.०२.२०२४ ते जुलै २०२४ या कालावधीच्या वाहतूक भत्ताचा निधीसाठीचा खर्च माहे एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ या कालावधीकरीता मंजूर करण्यात आलेल्या लेखानुदानातून भागविण्यात यावा." असे वाचण्यात यावे.
रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना थकीत रक्कमेसह 12 % व्याजदराने रक्कम मंजूर, शासन निर्णय
या पदांना वाहतूक भत्ता देताना राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर जात असतानाही दिव्यांग शिक्षकांच्या पाठिशी ठाम राहत वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापोटी मासिक सहा लाख २९ हजार १०० तर वार्षिक ७५ लाख ४९ हजार २०० इतका अतिरिक्त खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे. (शासन निर्णय)
अधिक माहितीसाठी : सुधारित शासन निर्णय पाहा